युक्तिवाद अंदाजावर आधारित, पुराव्यावर असावेत; सीबीआय, ईडीला सुप्रीम काेर्टाचे फटकारे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 08:54 AM2023-10-06T08:54:30+5:302023-10-06T08:54:46+5:30
दिल्ली उत्पादन शुल्क ‘घोटाळा’ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय आणि ईडीला अनेक प्रश्न विचारत फटकारले.
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क ‘घोटाळा’ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय आणि ईडीला अनेक प्रश्न विचारत फटकारले. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला कसा बनवला गेला? पुरावे एकमेकांशी जोडलेले नाहीत. तुमचे युक्तिवाद अंदाजावर आधारित आहेत, ते पुराव्यावर असावेत, या शब्दात कोर्टाने फटकारले.
संजय सिंह यांना ईडी कोठडी
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे (आप) वरिष्ठ नेते, राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना गुरुवारी येथील एका न्यायालयाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली. सिंह यांना अटक केल्याने आप कार्यकर्त्यांनी देशभरात भाजप कार्यालयांसमोर आंदोलने केली. यावेळी अनेक आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली.