पोलिस मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी आरिब भारतात परतला ?
By admin | Published: October 2, 2015 02:39 PM2015-10-02T14:39:28+5:302015-10-02T14:40:10+5:30
इसिस ही दहशतवादी संघटना सोडून भारतात परतलेला आरिब माजिद हा पोलिस मुख्यालयात आत्मघाती हल्ला घडवण्याच्या इराद्याने परतला होता अशी माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (इसिस) ही दहशतवादी संघटना सोडून भारतात परतलेला आरिब माजिद हा पोलिस मुख्यालयात आत्मघाती हल्ला घडवण्याच्या इराद्याने परतला होता अशी माहिती समोर आली आहे.
कल्याणमधील चार तरुण इसिस या दहशतवादी संघटनेत भरती झाले होते. यातील आरिब माजिद हा तरुण भारतात परतला असून सध्या तो तुरुंगात आहे. बुधवारी ट्विटरवर मॅग्नेट गॅस नामक ट्विटर अकाऊंटवर आरिबचे सिरीयातील छायाचित्र अपलोड करण्यात आले आहेत. तसेच आरिबच्या दहशतवादी कारवायांचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. आरिब हा सिरीयात असताना सातत्त्याने त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. आरिबच्या बहिणीवर पोलिसांनी छळ केल्याची माहिती त्याच्या कुटुंबाने घेतला. या पोलिसांचा सूड घेण्याच्या इराद्याने आरिब भारतात परतला होता. भारतात आल्यावर आरिब पोलिस मुख्यालयात आत्मघाती हल्ला घडवणार होता असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. कुटुंबाशी संपर्कात राहणे ही आरिबची सर्वात मोठी चुक होती असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.आरिबने सिरीयात चार वेळा आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र यातील एकाही हल्ल्यात तो यशस्वी ठरला नाही असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले.
आरिबला भारतात परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी ही खोटी माहिती दिल्याचे कालांतराने स्पष्ट झाले. भारतात परतताच आरिबला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती.