बिकानेरमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईहल्ला
By Admin | Published: October 5, 2016 09:01 AM2016-10-05T09:01:57+5:302016-10-05T10:28:06+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये ही घटना घडली आहे. शाईफेकप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
राजस्थान, दि.5 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये ही घटना घडली आहे. शाईफेकप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शाई फेकणारा अभाविपचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला आहे. याशिवाय, शाईहल्ला होण्याआधी जोधपूरहून बिकानेरकडे जात असताना नोखामध्ये केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#WATCH: Ink thrown on Delhi Chief Minister Arvind Kejriwal in Bikaner (Rajasthan) last night, two men detained. pic.twitter.com/C7eNp6BxLg
— ANI (@ANI_news) October 5, 2016
आणखी बातम्या :
'माझ्यावर शाईफेक करणा-यांचे देव भले करो, अशी मी प्रार्थना करतो', असे ट्विट शाईहल्ल्यानंतर केजरीवाल यांनी केले आहे. सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात पंतप्रधान मोदींचे कौतुक करत, पंतप्रधानांनी पाकिस्तानचा अजेंडा जगासमोर आणला पाहिजे, असं सांगत कारवाईचे पुरावे सादर करण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. यावरुन केजरीवाल सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करत असल्याचा आरोप होत असून त्याच्याविरोधात टीका आणि निषेध व्यक्त करणे सुरू आहे.
Hmmm... God bless those who threw ink at me. I wish them well.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 4, 2016