Arijit Singh: ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:47 PM2022-12-29T15:47:49+5:302022-12-29T15:49:18+5:30
भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले.
प्रसिद्ध सिंगर अरिजित सिंगची कोलकाता येथे होणारी कॉन्सर्ट राज्य सरकारने रद्द केली आहे. अरिजित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटातील 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे गाणे गाणार होता, त्यामुळेच सरकारने कॉन्सर्ट रद्द केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, G-20 कार्यक्रमामुळे कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने इको पार्क येथे हा कार्यक्रम होणार होता. तर समोरच हॉलमध्ये G-20 कार्यक्रम प्रस्तावित आहे.
Sr Bachchan was on dot when he spoke about shrinking space for civil liberties and freedom of expression at the Kolkata Film Festival.
— Amit Malviya (@amitmalviya) December 28, 2022
Arijit Singh who sang “Rang de tu mohe gerua”, with Mamata Banerjee on the dais now finds his show at EcoPark cancelled by HIDCO, a WB Govt body.
भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरिजित सिंगच्या गाण्यामुळे ममता सरकारने कॉन्सर्टला परवानगी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याने आणि अरिजित सिंग 'रंग दे तू मोहे गेरुआ...' या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करणार होते. अशा स्थितीत सरकारने ती रद्द केली आहे. भाजपच्या या आरोपानंतर पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. फिल्म फेस्टिव्हल आणि जी-20 कार्यक्रमाच्या तारखा एकमेकांशी भिडत असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 च्या कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता असल्याने कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे.
दिलवाले चित्रपट गाणे
मिळालेल्या माहितीनुसार, 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटाचे मुख्य गाणे आहे. याशिवाय अरिजित सिंगचे हे सर्वात लोकप्रिय गाणे आहे. बंगाली गाण्यासोबत हे गाणे कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते. पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले की, जी-20 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. दोन्ही कार्यक्रम एकाच कॅम्पसमध्ये होणार होते आणि अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता होती.
हा कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी प्रस्तावित होता
आतापर्यंत प्रस्तावित कार्यक्रमानुसार अरिजित सिंगची कॉन्सर्ट 18 फेब्रुवारीला होणार होती. मात्र आता हा कार्यक्रम पुन्हा कधीतरी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. सलमान खानचा शोही पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच आवारात हा शो देखील प्रस्तावित होता.