जया बच्चन यांच्या 'रागा'वर 'महाभारत'मधील ‘अर्जुना’ची टिप्पणी; केली वादग्रस्त कॉमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:58 AM2021-12-23T00:58:00+5:302021-12-23T00:59:26+5:30
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.
नवा दिल्ली - संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत भाषण केले, यावेळी त्या प्रचंड संतापल्याचे बघायला मिळाले. या भाषणादरम्यान त्यांनी भाजपला शापही दिला. त्यांच्या या भाषणावर आता प्रसिद्ध टीव्ही कलाकार फिरोज खान यांनी टिप्पणी केली आहे.
‘अर्जुना’ने केली वादग्रस्त कॉमेंट -
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.
काय आहे वादग्रस्त कॉमेंट?
जया बच्चन यांनी संसदेत भाषण करून दोन दिवस झाले, पण अद्यापही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. अशातच, अभिनेता फिरोज खान यांनी ट्विट करत, ‘अमिताभ बच्चन यांनी गेल्या 50 वर्षांत जी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांच्या ‘नटगुल्ली’ पत्नीने त्या प्रतिष्ठेचा कचरा केला,’ असे म्हटले आहे. फिरोज खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगने व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही लोक प्रतिक्रिया देत आहेत.
अमिताभ बच्चन ने पिछले 50 सालों में जो अपनी इज्ज़त बनाई थी
— Firoz Khan (@Efirozkhan) December 21, 2021
उसकी "नटगुल्ली" पत्नी ने उस इज्ज़त का कबाड़ा कर दिया
भाजपला दिला होता शाप -
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. लवकरच तुचे वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांची ही टिप्पणी आली आहे.
यावेळी, माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका करण्यात आली, पण मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, असे जया बच्चन यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता.