अभिनेता अर्जुन रामपालवर मारहाणीचा गुन्हा दाखल
By admin | Published: April 9, 2017 12:26 PM2017-04-09T12:26:14+5:302017-04-09T17:36:37+5:30
बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर काहीसा अज्ञातवासात गेलेला अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा चर्चेत आला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर काहीसा अज्ञातवासात गेलेला अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र आता तो चित्रपटामुळे नव्हे, तर एकाला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. नवी दिल्लीतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्जुन रामपालनं एका फोटोग्राफरला पहाटे 3.30 वाजता मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
अर्जुन रामपाल एक फोटोग्राफरवर अचानक फोटो घेतल्यानं प्रचंड संतापला. संतापाच्या भरात त्यानं त्या फोटोग्राफरचा कॅमेरा खेचून फेकून दिला आणि त्यानंतर त्या फोटोग्राफरला मारहाण केली, अशी माहिती मारहाण करण्यात आलेल्या फोटोग्राफरनं दिली आहे. तसेच पोलीस या प्रकरणात मला मदत करत नसल्याचंही या फोटोग्राफरनं सांगितलं आहे.
Complaint of assault filed against Arjun Rampal in Delhi, according to the complainant the incident took place in a 5 star hotel pic.twitter.com/VeZeN1s9LS
— ANI (@ANI_news) April 9, 2017
Arjun Rampal allegedly got angry after photographer clicked pic&Rampal snatched his camera & threw it which hit the complainant injuring him
— ANI (@ANI_news) April 9, 2017
Incident happened at 3.30 am, I don"t know why Arjun Rampal threw camera at me.Police not cooperating at all: Shobhit,Victim pic.twitter.com/eFM6P5mXGn
— ANI (@ANI_news) April 9, 2017
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अर्जुन रामपालचा डॅडी हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अहलुवालिया दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळीची मुख्य भूमिका साकारतो आहे. गवळीला ओळखणारे लोक त्याला डॅडी या नावानंही संबोधतात. त्यामुळेच अरुण गवळीचं टोपण नाव डॅडी हे या चित्रपटाला शीर्षक देण्यात आलं आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसोबत विद्या बालनही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात गवळीच्या दूधवाला, गँगस्टर आणि त्यानंतर राजकीय नेता बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.