सुवर्ण मंदिरात सशस्त्र संघर्ष
By admin | Published: June 7, 2014 01:24 AM2014-06-07T01:24:24+5:302014-06-07T01:24:24+5:30
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृतिदिनी शुक्रवारी दोन गटांत झालेल्या सशस्त्र संघर्षात किमान 12 जण जखमी झाले.
Next
>ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा स्मृतिदिन : तलवारी, भाले अन् लाठय़ाकाठय़ांनी हल्ला
अमृतसर - सुवर्ण मंदिरात 3क् वर्षापूर्वी झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृतिदिनी शुक्रवारी दोन गटांत झालेल्या सशस्त्र संघर्षात किमान 12 जण जखमी झाले. या प्रकरणी 28 जणांवर एफआयआर दाखल झाला असून, 21 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.
अमृतसरचे पोलीस आयुक्त जतिंदर सिंग औलख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृतिदिनानिमित्त येथील हरमिंदर साहबमधील अकाल तख्तमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अकाल तख्तचे प्रमुख गुरुबचन सिंग बोलत असताना मध्येच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सिमरनजित सिंग मान यांनी आपल्या पाठीराख्यांसह अकाल तख्तच्या व्यासपीठावरून बळजबरीने बोलण्यास सुरुवात केल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यांना बोलण्यापासून रोखल्यानंतर अकाली दलाचे कार्यकर्ते व शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या टास्क फोर्सच्या रक्षकांसोबत बाचाबाची झाली. या वेळी टास्क फोर्सचे जवान व कार्यकत्र्यानी एकमेकांवर तलवारी उपसल्या, भाले रोखले व लाठय़ाही उगारल्या. त्याने भाविकांमध्ये घबराट पसरली व ते सैरावैरा धावू लागले.
खासदारांकडून निषेध
नवी दिल्ली: सुवर्ण मंदिर परिसरात झालेल्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना पंजाबच्या खासदारांनी आज धर्म व राजकारणात अंतर राखले पाहिजे, असे मत व्यक्त केले.