भूजमध्ये लष्करी तळाची हेरगिरी करणा-यास अटक

By admin | Published: March 5, 2016 01:01 PM2016-03-05T13:01:44+5:302016-03-05T13:03:25+5:30

गुजरातच्या भूज जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ हेरगिरी करणा-या इसमास अटक करण्यात आली आहे.

Armed with military base espionage in Bhuj | भूजमध्ये लष्करी तळाची हेरगिरी करणा-यास अटक

भूजमध्ये लष्करी तळाची हेरगिरी करणा-यास अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
भूज, दि. ५ - गुजरातच्या भूज जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ हेरगिरी करणा-या इसमास अटक करण्यात आली आहे. गुप्तहेर विभागाने शनिवारी एका संशयित इसमास लष्करी तळाजवळू छायाचित्रे काढताना ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील काही ठिकाणांची छायाचित्रे आढळली. याप्रकरणी त्या इसमाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
कोटेश्वर समुद्र किना-याजवळ सापडली पाकिस्तानी बोट
दरम्यान भूजजवळील समुद्रात पाकिस्तानी नाव सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोटेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ पाकिस्तानी नाव सापडली असून पोलिस व सुरक्षारक्षक त्या बोटीची कसून    तपासणी करत असून, जवळपासच्या भागातही शोध घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यातही गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात एक नाव पकडण्यात आली, त्यातील सर्वजण पाकिस्तानमधील मच्छिमार होते.

Web Title: Armed with military base espionage in Bhuj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.