हिंदूंच्या संरक्षणासाठी बजरंग दलाकडून कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण
By admin | Published: May 23, 2016 02:36 PM2016-05-23T14:36:33+5:302016-05-23T14:39:03+5:30
हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या बजरंग दलाने उत्तरप्रदेशातील आपल्या कार्यकर्त्यांना बंदुक, तलवार आणि लाठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अयोध्या, दि. २३ - हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या बजरंग दलाने उत्तरप्रदेशातील आपल्या कार्यकर्त्यांना बंदुक, तलवार आणि लाठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अन्य धर्मीयांपासून हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. अयोध्येमध्ये बजरंग दलाकडून नुकतेच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पाच जूनपर्यंत सुल्तानपूर, गोरखपूर, पिलीभित, नोएडा आणि फत्तेपूरमध्ये बजरंग दलाकडून शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. आतापर्यंत बजरंग दलावर दोन धर्मांमध्ये सांप्रदायिकता भडकवण्याचे अनेक आरोप झाले आहेत.
अशा शिबिरांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी लोकांना तयार करता येते. जे भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणत नाहीत ते आमचे बांधव नाहीत असे उत्तरप्रदेश बजरंग दलाचे सचिव अंबरीश सिंह यांनी सांगितले. बजरंग दलाकडून विविध राज्यांमध्ये गो संरक्षण कार्यक्रमही राबवला जात आहे.
आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना रायफल, तलवार चालवण्याबरोबर मार्शल आर्टसचेही प्रशिक्षण देत आहोत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही लष्करी प्रशिक्षणावर भर दिला आहे असे बजरंग दलाचे पश्चिम यूपीचे संयोजक बलराज यांनी सांगितले.