नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:52 AM2020-05-31T04:52:38+5:302020-05-31T04:53:05+5:30

सुधीर देवरे यांचे मत। दोन्ही देशांमध्ये लोकसंवाद; नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत आहेत

Army away from the politics of Nepali rulers | नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

Next

टेकचंद सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लिपुलेख वादावरून भारतीय लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांना प्रत्युत्तर देण्यास नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांनी नकार दिल्याने लष्कर व सत्ताधाऱ्यांमधील वाद समोर आले आहेत. लष्कराने या वादात सत्ताधाºयांच्या भारतविरोधात न पडण्याची भूमिका घेतली. प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये सीमेवरून वाद कधीच नव्हता; परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे लक्ष हटवण्यासाठी व राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्यासाठीच नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत असल्याचे मत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी व्यक्त केले.
नेपाळमधील अंतर्गत राजकारणात तेथील लष्कराला पडायचे नसल्याचे नमूद करून देवरे म्हणाले, नेपाळी लष्कराला दाखवायचे की, आम्ही प्रोफेशनल आहोत. राजकीय मुद्यांमध्ये आम्ही भाग घेत नाही. भारत चीनमध्येही तणाव आहे. भारत नेपाळमध्येही कालापानी, लिपुलेखवरून सध्या तणाव आहे; पण नेपाळी लष्करास त्यात पडायचे नाही. कारण दोन्ही देशांमध्ये पीपल टू पीपल अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.
कोरोनामुळे भारताने लॉकडाऊन केले. काही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नेपाळमध्ये भासू लागली; पण चिनी व्हायरसपेक्षा भारतीय व्हायरस जास्त भयावह आहे, हे पंतप्रधान ओली यांचे मत नेपाळी लोकांना अजिबात आवडले नाही. कारण लॉकडाऊनचा दोष भारताला देण्यात काहीच अर्थ नाही, त्यात भारताचा काहीच दोष नाही, असे स्थानिकांचे ठाम मत आहे. शिवाय सध्या नेपाळवर चीनचा प्रभाव जास्त आहे.
कुणाच्या तरी इशाºयावरून
चीनचा उल्लेख न करता नरवणे यांनी ‘इतर’ कुणाच्यातरी इशाºयावरून नेपाळ या मार्गाचा विरोध करीत आहे, असे विधान केले. नेपाळमधून सत्ताधाºयांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. लष्करप्रमुख थापा यांनी पंतप्रधान ओली यांची सूचना धुडकावून नरवणेंना प्रत्युत्तर देण्याचे टाळले. घटनाक्रमाचा वेध देवरे यांनी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेतला.

पंतप्रधान ओली का करीत आहेत भारतविरोध?
च्मुळात ओली दोन वर्षांपूर्वी नेपाळी राष्ट्रवादावरच (अँटी इंडियनिझम) निवडून आले. तोच मुद्दा ते अजूनही काढत असतात. अलीकडे त्यांना स्थानिककम्युनिस्ट पक्षातही विरोधसुरू झाला.
च्कारकीर्द संपत असताना गव्हर्नर टीका करीत होते. चीनने मध्यस्थी केली म्हणून त्यांचे पद स्थिर झाले. त्या पार्श्वभूमीवर ते भारतविरोध करीत आहेत. आता नेपाळमध्ये चीनविरोध सुरू झाला.
च्भारतीय लष्करप्रमुख नेपाळी लष्कराचे सन्माननीय जनरल असतात. गोरखा भारतीय लष्करात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे वाद चर्चेतून नक्की सुटू शकतील.

Web Title: Army away from the politics of Nepali rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.