सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

By admin | Published: September 30, 2014 01:50 AM2014-09-30T01:50:57+5:302014-09-30T01:50:57+5:30

गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.

Army-BJP Thurtas Nuclear Pair | सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

Next
>हरीश गुप्ता  - नवी दिल्ली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना याच आठवडय़ात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असले, तरी हे दोन्ही भगवे पक्ष इतक्या लवकर एकमेकांपासून पूर्णपणो काडीमोड घेण्याची शक्यता दिसत नाही. गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडून आलेल्या दबावानंतरच जाहीर केले आहे. गीते हे दस:यानंतर म्हणजे 4 ऑक्टोबरला मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या 
भेटीत गीते कदाचित राजीनामाही देतील, पण लोकसभेत 18 खासदार आणि राज्यसभेत 3 खासदार असलेल्या शिवसेनेला मोदी 
सरकारला पाठिंबा काढून घेण्याचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी जरा वेळच लागेल.
उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली असली तरी हा प्रश्न 15 ऑक्टोबरच्या मतदानार्पयत तरी त्यांना सारखा सतावत राहील. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 1क्7 आणि भाजपाला 77 जागा मिळतील, असे भाकीत एसी नेल्सन या संस्थेने आपल्या निवडणूकपूर्व पाहणीत वर्तविल्याने शिवसेनेत थोडाफार उत्साह संचारला आहे. 
महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला वा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता राहील. एसी नेल्सनचा अंदाज खरा ठरला तर निवडणुकीनंतर उद्भवणा:या परिस्थितीत मात्र शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यास बाध्य होऊ शकतात.
 
पंतप्रधान मोदी अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु गीतेंना राजीनामा द्यायला भाग पाडणारे राज ठाकरे हे शिवसेना रालोआ सरकारमधून बाहेर पडेर्पयत उद्धव ठाकरे यांच्यावर सतत दबाव आणत राहणार, हे मात्र निश्चित. 
 
आम्ही अनंत गीते यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचीच वेगळे होण्याची इच्छा आहे, असे भाजपाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे. 

Web Title: Army-BJP Thurtas Nuclear Pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.