सैन्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करु शकतो - धोनी

By admin | Published: February 21, 2016 04:57 PM2016-02-21T16:57:14+5:302016-02-21T17:10:16+5:30

सैन्य दलामुळे आपण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करण्याच्या स्थितीत आहोत असे टि्वट धोनीने केले आहे.

Army can discuss freedom of expression - Dhoni | सैन्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करु शकतो - धोनी

सैन्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करु शकतो - धोनी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरुन देशात गदारोळ माजलेला असताना भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सैन्यदलाचे कौतुक केले आहे. सैन्य दलामुळे आपण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करण्याच्या स्थितीत आहोत असे टि्वट धोनीने केले आहे. 
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्यानंतर जी कारवाई सुरु आहे. त्यावरुन अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा प्रचार सुरु केला आहे. धोनीने हे टि्वट करुन अप्रत्यक्षपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा प्रचार करणा-यांना चपराक लगावली आहे. 
स्पेशल फोर्सेस, कमांडो युनिटमध्ये जे जवान आहेत ते तुमच्या आमच्यासारखेच सामान्य नागरीक आहेत पण, स्वत:च्या आधी ते देशहित जपण्याला पहिले प्राधान्य देतात असे टि्वटसमध्ये धोनीने म्हटले आहे. संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन वाद-विवाद सुरु असताना धोनीने व्यक्त केलेल्या या मतांना महत्व आहे. 

Web Title: Army can discuss freedom of expression - Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.