...तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 04:00 PM2019-09-12T16:00:07+5:302019-09-12T16:00:34+5:30
पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे.
अमेठीः पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे. लष्कर पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अभियान राबवण्यास सज्ज आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी पीओकेसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना रावत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर परत भारतानं मिळवण्याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. मोदी सरकारनं सांगितल्यास आम्ही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास पूर्ण तयार आहोत. लष्कर कोणत्याही अभियानासाठी सदैव तयार असल्याचा उल्लेखही बिपीन रावत यांनी केला आहे.
रावत म्हणाले, पीओकेसंदर्भात सरकारनं केलेल्या विधानामुळे आनंद झाला. परंतु याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. आम्ही आदेशावर काम करतो. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पीओकेसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत आता पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. 6 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370वरच्या चर्चेदरम्यान संसदेत सांगितलं होतं की, आम्ही जीव देऊ पण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवूच.
पाकव्याप्त काश्मीरबद्दल लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले, सरकारनं पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लष्कर कोणत्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी तयार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचंही लष्कर प्रमुखांनी स्वागत केलं आहे. काश्मीरचे लोक आमच्या देशातीलच आहे. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांना शांती बहाल करण्यासाठी सुरक्षा जवानांना एक संधी दिली पाहिजे. 30 वर्षं त्यांनी दहशतवादाला तोंड दिलं. आता शांतीसाठी त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे.#WATCH Army Chief, General Bipin Rawat on Union Minister Jitendra Singh's statement, “Next agenda is retrieving PoK & making it a part of India”: Govt takes action in such matters. Institutions of the country will work as per the orders of the govt. Army is always ready. pic.twitter.com/RUS0eHhBXB
— ANI (@ANI) September 12, 2019