पाकच्या नापाक हरकतींना जशास तसं उत्तर द्या; लष्कर प्रमुख एम.एम नरवणेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 08:59 PM2020-02-18T20:59:18+5:302020-02-18T20:59:47+5:30
लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणार्या शस्त्रसंधी उल्लंघनां दरम्यान लष्कर प्रमुख एम.एम नरवणे हे नगरोटा येथे पाहणी केली. तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख तेथे दाखल झाले होते. यावेळी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याबाबत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्करप्रमुखांना माहिती दिली.
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. पाकिस्तानी सैन्याने जर एलओसीला चिथावणी देण्याचे प्रकार केले तर त्यांना चोख उत्तर द्या असे आदेश लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Army Sources: Military commanders will also review the measures taken by the army to neutralise Pakistan's attempts there. Army Chief General MM Naravane has given clear instructions to commanders to give a befitting reply to Pakistan Army in case of provocation by them on LoC. https://t.co/XVsbhHwDLM
— ANI (@ANI) February 18, 2020
पीओकेमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत
दरम्यान, काश्मीरमधील 15 व्या कोर्सेसच्या मुख्य सामरिक कमांडचे लेफ्टनंट जनरल कंवल जीतसिंग ढिल्लन यांनी म्हटले की, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादांचे तळ लागले आहेत. युद्ध विराम संघर्ष करण्याच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. खोऱ्यात शांतता भंग करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नात ते यशस्वी होऊ शकणार नाही असा विश्वास जीतसिंह ढिल्लन यांनी व्यक्त केला.