सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-यांवर कारवाईचा लष्करप्रमुखांचा इशारा
By admin | Published: January 15, 2017 06:34 PM2017-01-15T18:34:00+5:302017-01-15T18:34:00+5:30
सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-या जवानांना ताकीद दिली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-या जवानांना ताकीद दिली आहे. तुमच्या समस्या आणि तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, काही जण यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. अशाप्रकारे तक्रारी केल्यास जवानांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गेल्या काही दिवसांपासून लष्कराच्या जवानांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. याचा परिणाम सीमेवर तैनात असणाऱ्या शूर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध आहेत. तक्रारीचं निराकरण न झाल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा असं रावत म्हणाले. अशाप्रकारे तक्रारी केल्यास जवानांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना “आम्हाला नियंत्रण रेषा आणि सीमेवर शांतता हवी आहे. मात्र, सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास सडेतोड उत्तर देण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”, असा इशारा लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानचं नाव न घेता दिला.