लष्कर दिवसाची परेड हाेणार पुण्यात? यामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:31 AM2022-09-21T09:31:46+5:302022-09-21T09:32:22+5:30

हवाई दल दिनाच्या परेडचेही स्थान बदलणार

Army day parade will be held in Pune? This is why the decision was taken | लष्कर दिवसाची परेड हाेणार पुण्यात? यामुळे घेतला निर्णय

लष्कर दिवसाची परेड हाेणार पुण्यात? यामुळे घेतला निर्णय

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांकडून लवकरच ‘लष्कर दिवस’ आणि ‘हवाई दल दिवस’ परेडला दिल्लीच्या बाहेर हलविण्यात येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, पुढील लष्कर दिवसाची परेड पुण्यात तर हवाई दल दिवसाची परेड चंडीगड येथे हाेऊ शकते. दाेन्ही दिवसांचे भारतीयांसाठी विशेष महत्त्व असून त्यांचे सेलिब्रेशन देशभरात व्हायला हवे, जेणेकरून विविध ठिकाणच्या नागरिकांना त्यात सहभागी हाेता येईल.

लष्कर दिवस १५ जानेवारी राेजी, तर हवाई दल दिवस ८ ऑक्टाेबरला साजरा करण्यात येताे. सध्या या दाेन्ही दिवसांच्या परेड अनुक्रमे दिल्ली आणि हिंडन एअर बेसवर हाेतात. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले, की पुढील वर्षी लष्कर दिवसाची परेड सदर्न कमांडमध्ये हाेईल. त्याचे मुख्यालय पुण्यात आहे. लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

यामुळे घेतला निर्णय
nसैन्य दलांचे माेठे समारंभ केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित राहू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची इच्छा आहे. देशातील दुसऱ्या भागातील लाेकांनाही त्यात सहभागी हाेता आले पाहिजे. 
nदुसरे कारण म्हणजे, देशभरातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही त्यात सहभाग घेता आला पाहिजे, असे पंतप्रधान माेदी यांना वाटते. आतापर्यंत काही निवडक शाळांच्या विद्यार्थ्यांनाच त्यात सहभागी हाेण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: Army day parade will be held in Pune? This is why the decision was taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.