Army Day: अभिमानास्पद! सैनिकांनो, गर्व आहे आम्हाला तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा

By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 12:10 PM2021-01-15T12:10:48+5:302021-01-15T12:13:31+5:30

Army Day: भारतीय सैन्याची खरी परंपरा आणि ओळख तुमचं धैर्य, निष्ठा आणि कर्तव्यासाठी कटिबद्धता आहे जी येणाऱ्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी असेल.

Army Day: Proud! Soldiers, we are proud of your courage, prowess and bravery, Narendra modi tweet | Army Day: अभिमानास्पद! सैनिकांनो, गर्व आहे आम्हाला तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा

Army Day: अभिमानास्पद! सैनिकांनो, गर्व आहे आम्हाला तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा

Next
ठळक मुद्देभारतीय सैन्य शोर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे.सैनिकांची नि:स्वार्थ सेवा आणि देशाबद्दल समर्पकवृत्ती यामुळे देशवासियांसाठी सैन्याचा अभिमान आहेआमचं लष्कर बलवान, धैर्यवान आणि दृढ आहे. ज्यांनी नेहमीच भारताची शान अभिमानाने उंचावले आहे.

नवी दिल्ली – देशभरात १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या दिग्गज नेत्यांनी लष्कराप्रती आपला सन्मान आणि आदर जाहीर करत सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक क्षणी जागरुक असणाऱ्या देशातील पराक्रमी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं लष्कर बलवान, धैर्यवान आणि दृढ आहे. ज्यांनी नेहमीच भारताची शान अभिमानाने उंचावले आहे. मी सर्व देशवासियांच्या वतीने भारतीय सैन्याला अभिवादन करतो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय की, सैन्य दिनानिमित्त भारतीय सैन्यातील सर्व शूर पुरुष आणि महिला जवानांना शुभेच्छा. आम्हाला त्या सर्व जवानांची आठवण येते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत नेहमीच धैर्यवान आणि सामर्थ्यवान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचे आभारी आहे. जय हिंद

गृहमंत्री अमित शहा यांनीही सैन्य दिनी भारतीय सैन्याच्या धैर्य आणि त्यागाबद्दल आभार मानले आहेत. गृहमंत्र्यांनी म्हटलंय की, भारतीय सैन्य शोर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. मी देशाच्या सूर सैनिकांच्या त्यागाला अभिवादन करतो, सैनिकांची नि:स्वार्थ सेवा आणि देशाबद्दल समर्पक यामुळे देशवासियांसाठी सैन्य अभिमान आहे. लष्कर दिनानिमित्त शूर सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा...

सैन्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस) बिपीन रावत आणि सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, आयएएफ चीफ एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि नौदल प्रमुख करमबीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला जाऊन आदरांजली वाहिली.

यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे बिपीन राव यांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, सैन्य दिनाच्या या ऐतिहासिक प्रसंगी आम्ही कर्तव्य बजावत असलेल्या सर्व जवानांचे आभार मानतो, ज्यांनी कर्तव्य पार पाडताना सर्वोच्च बलिदान दिलं आहे. तुमची ही शक्ती आम्हाला प्रेरणा देते, भारतीय सैन्याची खरी परंपरा आणि ओळख तुमचं धैर्य, निष्ठा आणि कर्तव्यासाठी कटिबद्धता आहे जी येणाऱ्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी असेल.

Web Title: Army Day: Proud! Soldiers, we are proud of your courage, prowess and bravery, Narendra modi tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.