CoronaVirus: गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:59 PM2021-05-23T19:59:21+5:302021-05-23T20:01:02+5:30

CoronaVirus: लष्करी सेवेतील एका डॉक्टरांनी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

army dr vk sinha wrote open letter to aiims director dr randeep guleria | CoronaVirus: गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

CoronaVirus: गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

Next
ठळक मुद्देगंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्सलष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलंपत्र लिहून स्पष्टीकरण देण्याची विनंती

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घसरण पाहायला मिळत असली, तरी वाढत्या मृत्युंमुळे चिंतेत भर पडत आहे. कोरोना परिस्थितीवरील नियंत्रण, उपाययोजनांसाठी केंद्र सरकार, AIIMS यांच्याकडून राज्यांना काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. मात्र, लष्करी सेवेतील एका डॉक्टरांनी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. गुलेरिया यांना एक पत्र लिहिले असून, त्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. (army dr vk sinha wrote open letter to aiims director dr randeep guleria)

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांची तीव्र टंचाई जाणवत होती. अनेकांनी यांच्या कमतरतेमुळे आपले प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक नुकसानही सोसावे लागल्याचे बोलले जात आहे. देशातील एकूणच गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मेजर जनरल डॉ. वी. के. सिन्हा यांनी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना खुले पत्र लिहित यासंदर्भात स्पष्टीकरण करावे, अशी विनंती केली आहे. 

‘ते’ कंपनीचं अधिकृत वक्तव्य नाही; सरकारवरील टीकेनंतर सीरमचं स्पष्टीकरण

काय म्हणतात वी. के. सिन्हा?

मीदेखील वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. आपण नक्कीच घरोघरी जाऊन अनेकविध गोष्टींवर अभ्यास केला असेल. आपले पद खूपच प्रतिष्ठेचे आहे. मात्र, एम्सचे संचालक म्हणून आपल्या पदाचे वलय मोठे आहे. आपला शब्द हा खेडोपाडी काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी प्रमाण असतो. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढते. मात्र, ७ एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी आयवरमेक्टिन औषधाचा वापर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, काहीच दिवसांनंतर सदर औषध प्रभावी नसल्याचे आपणच सांगितले. हा विरोधाभास नाही का, अशी विचारणा सिन्हा यांनी केली आहे. 

“एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी

WHO कडून आधीच पुष्टी

मार्च महिन्यातच या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सदरचे औषधाचा प्रभावीपण म्हणावा तितका सिद्ध झालेला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या गोष्टीकडे आपण लक्ष दिले नाहीत. औषधात काय योग्य आणि काय चुकीचे आहे, याचा निर्णय घेण्यासाठी देशातील सर्वांत मोठे न्यायाधीश म्हणून आपण अशी चूक करू शकत नाही. या औषधाबाबत सूचना केल्या गेल्या, यात काहीच गैर नाही. मात्र, सूचना केल्याच्या काहीच दिवसांत हे औषध बाजारातून गायब झाले. काळाबाजार वाढला. मागणी प्रचंड वाढली. दलालांनी यात भरपूर कमाई केली. यानंतर रेमडेसिवीर आणि अन्य औषधांच्या बाबतीतही तेच झाले, हे चुकीचे आहे, या शब्दांत बजावत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती केली आहे. यासह अनेकविध मुद्दे सिन्हा यांनी आपल्या पत्रात मांडले आहेत. 
 

Web Title: army dr vk sinha wrote open letter to aiims director dr randeep guleria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.