सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 12:03 PM2017-08-26T12:03:15+5:302017-08-26T12:18:03+5:30

पंजाब-हरयाणामध्ये कालच्या सारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे. 

Army enters headquarters at Sirsa, head of Rapid Action Force | सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

googlenewsNext

पंचकुला, दि. 26 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला साध्वीवरील बलात्कार प्रकरणात सीबीआयने कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणा-पंजाबमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला होता. आज अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे. 
 - हरयाणातील सिरसा येथी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले आहेत. 



- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीत पंजाब-हरयाणातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत. 



- काल झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला तर, 250 हून अधिक जखमी झाले होते. 
- हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारीया येथील तुरुंगात गुरमीत राम रहीमला ठेवण्यात आले आहे. सामान्य कैद्यासारखीच त्याला वागणूक दिली जात आहे. 



- सिरसामधील आश्रमात हजारो डेरा समर्थक आहेत. 
- पंजाब, हरयाणामधील अऩेक भागात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

- पंजाबच्या मानसामध्ये लष्कराने फ्लॅग मार्च केला. 



- कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान पंजाब-हरयाणाला जाणा-या 309 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

 हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणे आले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे.  एकूणच खट्टर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. हरयाणात पंचकुला आणि अन्य भागात शुक्रवारी जो हिंसाचार झाला त्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला तर, 250 पेक्षा जास्त जखमी झाले. 

प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे. 

2014 मध्ये रामपाल नावाच्या बाबाला अटक करताना झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाट आंदोलनाच्यावेळी 30 जणांना प्राण गमावावे लागले होते. आता गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. एकूणच महत्वाच्या प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यात मनोहर लाल खट्टर सरकार अपयशी ठरले आहे. 
 

Web Title: Army enters headquarters at Sirsa, head of Rapid Action Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा