ISI'साठी हेरगिरी केली, लष्करी जवानाला अटक; १५ लाखांच्या बदल्यात नकाशा अन् अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची माहिती दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:40 IST2025-02-09T14:20:16+5:302025-02-09T14:40:35+5:30

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सैन्याची गोपनीय माहिती १५ लाख रुपयांसाठी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

Army jawan arrested for spying for ISI gave map and information about officers' postings in exchange for Rs 15 lakhs | ISI'साठी हेरगिरी केली, लष्करी जवानाला अटक; १५ लाखांच्या बदल्यात नकाशा अन् अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची माहिती दिला

ISI'साठी हेरगिरी केली, लष्करी जवानाला अटक; १५ लाखांच्या बदल्यात नकाशा अन् अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची माहिती दिला

नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याद्वारे त्याने आयएसआयला गुप्तचर माहिती आणि लष्कराची गुपिते पुरवली आहेत. आरोपीने या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. 

शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी सांगितले की, आरोपी संदीप सिंहने सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे.

एसएसपींनी सांगितले की, आरोपी संदीप सिंह २०१५ मध्ये सैन्यात भरती झाला होता. पटियालामधील सरदुलगड येथील रहिवासी संदीप सिंह त्याच्या साथीदारांसह देशातील अनेक लष्करी छावण्यांबद्दल माहिती गोळा करत आहे आणि ती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठवत होता.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत १२ नक्षलवादी ठार, २ जवानही शहीद

पोलिसांनी आरोपीचे तिन्ही मोबाईल फोन जप्त केले आहेत, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. गेल्या दोन वर्षांत संदीप सिंहने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रांची माहिती आणि अधिकाऱ्यांच्या तैनातीची माहिती आयएसआयला पाठवली होती, असं प्राथमिक तपासात दिसून आले. 

पटियाला येथून अटक 

आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर पटियालाला आला होता. संधी मिळताच घरिंडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला पटियाला येथूनच अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने अनेक गुपिते उघड केली आहेत.
यापूर्वी पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपाल सिंहलाही अटक केली होती. आयएसआयच्या सूचनेनुसार, आरोपीने फिरोजपूरमधील एका निर्जन ठिकाणी अमृतपाल सिंहला २ लाख रुपये दिले होते.

दुसरीकडे, अटक केलेल्या अमृतपाल सिंहचा सहकारी राजबीर सिंह नाशिक कॅन्टोन्मेंटमधून पळून गेला आहे. शुक्रवारी अमृतसर ग्रामीण पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले. पथक तिथे पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेला. अमृतपाल सिंहच्या अटकेनंतर पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये याबाबत अलर्ट जारी केल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

Web Title: Army jawan arrested for spying for ISI gave map and information about officers' postings in exchange for Rs 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.