लष्कराच्या अधिकाऱ्याने मुक्या प्राण्यासाठी आपला जीव घातला धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 03:55 PM2020-03-01T15:55:30+5:302020-03-01T15:58:48+5:30
दुसऱ्या कुत्र्याला वाचवत असताना ते स्वत: ९० टक्के भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
श्रीनगर- काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये घराला लागलेल्या आगीत फसलेल्या आपल्या कुत्र्यांचे प्राण वाचवताना लष्कर अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री या अधिकाऱ्याच्या घराला आग लागली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. एसएसटीसीमधील कोअर सिग्नलच्या कामाशी संबंधित मेजर बुधराज यांनी आपली पत्नी आणि एका कुत्र्याला आगीने वेढलेल्या घरातून सुखरूप बाहेर काढले. तर दुसऱ्या कुत्र्याला वाचवत असताना ते स्वत: ९० टक्के भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेजर अंकित बुधराज असं या लष्करातील अधिकाऱ्याचं नाव आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पेटलेल्या कुत्र्यांसह वाचवण्यासाठी सैन्याच्या एका प्रमुखांनी आपला जीव धोक्यात घातला. यावेळी, आपल्या दोन कुत्र्यांचा जीव वाचवताना स्वत: लष्करी अधिकारीही गंभीररित्या जळाला आहे. त्यामुळे मेजर अंकित बुधराज यांचा जागीच मृत्यू झाला. सैन्य दलातील या अधिकाऱ्याच्या धैर्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. या घटनेची परिसरात चर्चा सुरु आहे. मुक्या प्राण्यासाठी या अधिकाऱ्याने आपल्या जीवाची आहुती दिली आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृत अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि कायदेशीर औपचारिकतांसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला गेला आहे.