PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला हवेत 6 महिने
By admin | Published: October 4, 2016 10:58 AM2016-10-04T10:58:20+5:302016-10-04T11:05:49+5:30
सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4-पाकिस्तानकडून वारंवार होणा-या दहशतवादी कारवायांना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर प्रभावी उपाययोजना आखण्याचा विचार करत आहे. सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे. एक-दोनदा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर दहशतवाद्यांचे काहीही नुकसान होणार नाही, त्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे असतील तर त्यासाठी मीडियम टर्म प्लान अंमलात आणणे गरजेचे आहे, असे लष्करातील वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले आहे.
तसेच,काश्मीरमधील तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि अन्य परिसरात हल्ले होणाच्या संशयावरुन सरकारने सतर्क राहण्याची गरज आहे, असे देखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे. यावेळी रविवारी बारामुल्ला इथे बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लागोपाठ कारवाया कराव्या लागतील, असे लष्कराचे म्हणणे आहे.
आणखी वाचा
लष्करातील वरिष्ठ अधिका-यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील दहशतवादी बॅकफुटवर आले आहेत, मात्र गाफील न राहता त्यांना गंभीर स्वरुपात हादरा द्यावा लागेल. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आणखी तळ निर्माण होऊ शकतात, ती आधीच उद्ध्वस्त करुन, नियंत्रण रेषेपलिकडे हल्ला करण्यासाठी काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवावी लागणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
भारतीय लष्कर आणि गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार, पाकव्याप काश्मीरमध्ये 40 पेक्षा जास्त दहशतादी प्रशिक्षण शिबिरे आहेत. ही सर्व शिबिरे दुर्गम ठिकाणी असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण रेषेजवळ 50 लॉन्च पॅड आहेत, ज्यात 200 हून अधिक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. ज्यांना पाकिस्तानी सैन्य आश्रय देत आहे.