जेवणाच्या ताटावरुन उठून गेलेला सैन्य दलाचा जवान परतलाच नाही
By admin | Published: March 13, 2016 12:04 AM2016-03-13T00:04:49+5:302016-03-13T00:04:49+5:30
फोटो
Next
फ टोजळगाव: जेवणाचा ताट तयार असताना त्याला पाठ देवून घरातून गेलेला प्रमोद बळीराम चौधरी (वय ३६ रा.म्हाडा कॉलनी, जळगाव मुळ रा.लोहारा ता.पाचोरा) हा सैन्य दलातील जवान नंतर घरी परतलाच नाही. मोबाईलही बंद येत असल्याने परिवाराची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.याबाबत प्रमोद या जवानाचा भाऊ विनोद चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, आठ मार्च रोजी रात्री साडे नउ वाजता म्हाडा कॉलनीतील घरात जेवणाची तयारी झालेली असताना प्रमोद हे अचानक घराबाहेर पडले. यावेळी त्यांना कोणाचा तरी फोन आला असावा,बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते न आल्याने पत्नीने त्यांना फोन केला असता मोबाईल बंद येत होता. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशला तक्रार नोंदविण्यात आली.तीन महिन्याच्या सुटीवर आलेे घरीप्रमोद चौधरी यांची दोन वर्षापासून कारगिल येथे ड्युटी आहे.३१ डिसेंबर रोजी तीन महिन्याच्या सुटीवर घरी आलेले आहेत. चार एप्रिल रोजी ते ड्युटीवर हजर होणार होते, त्यासाठी त्यांचे रेल्वेचे आरक्षणही झालेले आहे.आई वडील व एक भाऊ लोहारा येथे शेती करतात तर दुसरा भाऊ विनोद हा देखील सैन्य दलातच दिल्ली येथे ड्युटीला आहे. प्रमोद यांची पत्नी व मुलगा दोन वर्षापासून जळगावात भाड्याचे घर घेवून शालक सुबोध चौधरी यांच्या शेजारीच राहत होते. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. तीन वर्षाची कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पत्नी व मुलाला ते सोबत घेवून जाणार होते.