लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 06:43 PM2020-07-01T18:43:25+5:302020-07-01T18:48:02+5:30

चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत.

Army ready in Ladakh, now Defense Minister Rajnath Singh will tour with Army Chief | लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

Next
ठळक मुद्देगलवान खोरे, पेंगाँग सरोवर, डेपसांग प्लेन्स आणि हॉट स्प्रिंग्स भागात चिनी सैन्य आक्रमक भारताने देखील चिनी सैन्या एवढेच जवान या भागात तैनात केले आहेतचीनने या भागात ज्या प्रकारची हत्यारे आणि दारुगोळा जमा केला आहे, ते पाहता भारताकडून देखील तयारी पूर्ण

लेह (लडाख) - चिनी सैन्याकडून सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न, गलवानमध्ये झालेली हिंसक झटापट यामुळे सध्या भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील अनेक संवेदनशील भागातून चीन घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आले आहे. तसेच दोन्ही बाजूंकडून सीमेवर लष्कर, दारुगोळ्याची मोठी जमवाजमव करण्यात आली आहे. त्यातच चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. यापूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लेह-लडाखचा दौरा केलेला आहे.  

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने खूप आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय लष्करानेही जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीत पूर्व लडाखमध्ये सध्या सुरक्षेची काय स्थिती आहे याचा आढावा  राजनाथ सिंह या दौऱ्यातून घेणार आहेत. तसेच लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या दौऱ्याप्रमाणेच राजनाथ सिंह देखील काही फॉरवर्ड पोस्टला भेट देऊ शकतात.  

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गलवान खोरे, पेंगाँग सरोवर, डेपसांग प्लेन्स आणि हॉट स्प्रिंग्स भागात चिनी सैन्य आक्रमक भूमिकेत आहे. त्यामुळे भारताने देखील चिनी सैन्या एवढेच जवान या भागात तैनात केले आहेत. त्याशिवाय चीनने या भागात ज्या प्रकारची हत्यारे आणि दारुगोळा जमा केला आहे, ते पाहता भारताकडून देखील तयारी पूर्ण झाली आहे.  यापूर्वी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी २३ जून रोजी लेह मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना लडाखमधील काही फॉरवर्ड पोस्टचा देखील दौरा केला होता.  

दरम्यान, सीमारेषेवर चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी हवाई दलसुद्धा सज्ज झालेले आहे. संपूर्ण विभागात अॅडव्हान्स क्विक रिअॅक्शन क्षमता असलेली सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम तैनात आहे.  ही सिस्टिम कुठल्याही लढाऊ विमानाला काही सेकंदात नष्ट करू शकते. तसेच पूर्व लढाखमध्ये आकाश क्षेपणास्त्रांचीही पाठवणी करण्यात आली आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

Web Title: Army ready in Ladakh, now Defense Minister Rajnath Singh will tour with Army Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.