कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:20 IST2025-04-23T19:14:47+5:302025-04-23T19:20:33+5:30
जम्मू काश्मीररच्या कुलगाममध्ये सैन्याने टीआरफच्या कमांडरला घेरलं असून चकमक सुरु आहे.

कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
Indian Security Forces Encounter in Kulgam: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जोरदार मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कुलगाममध्ये मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. कुलगाम येथे भारतीय सैन्याने टीआरएफ कमांडरला घेरले आहे. कुलगाममधील तनमार्गमध्ये टीआरएफ कमांडरला घेरण्यात आलं असून चोरदार चकमक सुरू आहे. गेल्या दहा तासांमध्ये जम्मू काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. सकाळी बारामुल्ला येथे दोन घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. त्यानंतर आता कुलगाममध्ये मोठी कारवाई सुरु आहे.
मंगळवारी पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांची हत्या केली होती. त्यानंतर आता दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात टीआरएफच्या दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफकडून ही कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळच्या सुमारास बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळालं. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दोन रायफलसह वस्तू जप्त केल्या आहेत. त्यानंतर आता कुलगाममध्येही सैन्याने दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवादी आणि सैन्य दलात चकमक सुरू आहे. तनमार्गमध्ये काही दहशतवादी लपले आहेत, ज्यांना सैन्याने सर्व बाजूंनी घेरले आहे.