बेवारस बॅगेत आढळला लष्कराचा गणवेश, पंजाबमध्ये हाय अलर्ट

By admin | Published: May 29, 2017 11:52 AM2017-05-29T11:52:33+5:302017-05-29T11:54:16+5:30

पंजाबमधील पठाणकोटमध्ये एका बॅगेत लष्कराचे तीन गणवेश आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत

Army uniform found in untested bag, High alert in Punjab | बेवारस बॅगेत आढळला लष्कराचा गणवेश, पंजाबमध्ये हाय अलर्ट

बेवारस बॅगेत आढळला लष्कराचा गणवेश, पंजाबमध्ये हाय अलर्ट

Next
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. 29 - पंजाबमधील पठाणकोटमध्ये एका बॅगेत लष्कराचे तीन गणवेश आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. बॅग सापडल्यानंतर स्वाट कमांडो आणि लष्कराने लगेचच सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. पठाणकोटमध्ये भारतीय नौदलाचं तळ आहे. गतवर्षी दहशतवाद्यांनी या ठिकाणी हल्ला केला होता. 
 
ही बेवारस बॅग ममून सैन्य लष्करी छावणीत रात्री उशीरा सापडली. यामध्ये पाच शर्ट आणि दोन पँट होत्या. एका स्थानिक नागरिकाने बॅगसंबंधी माहिती दिल्यानंतर पठाणकोट शहर आणि सैन्य छावणी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. "आम्ही लष्कराच्या अधिका-यांसोबत सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. आम्ही एका संशयिताचा शोध घेत आहोत", अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. 
 
2015 रोजी लष्कराच्या गणवेशात शस्त्रधारी तीन दहशतवाद्यांनी एक कार हायजॅक करत गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनाननगर पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका एसपीसहित सात जणांचा मृत्यू झाला होता. तर सीमारेषा पार करुन आलेल्या चार दहशतवाद्यांनी गतवर्षी 1 आणि 2 जानेवारी रोजी पठाणकोटमधील भारतीय नौदलाच्या तळावर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते. 
 

Web Title: Army uniform found in untested bag, High alert in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.