विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 07:10 PM2020-01-29T19:10:14+5:302020-01-29T19:12:55+5:30
चार विमान कंपन्यांकडून कुणाल कामरावर प्रवास बंदी
नवी दिल्ली: पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्यानं कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोनं सहा महिने प्रवास बंदी घातली. यानंतर आज पुन्हा एकदा कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी विमानात आमनेसामने आले. कुणालनं याबद्दलची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
लखनऊहून परतताना पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी मला विमानात भेटले होते, अशी माहिती कुणालनं ट्विट करुन दिली. तत्पूर्वी काल लखनऊला जाताना गोस्वामी आणि कुणाल समोरासमोर आले होते. त्यावेळी कुणालनं अर्णब यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल प्रश्न विचारले. तुम्ही अतिशय भित्रे आहात, असल्याचं कुणालनं अर्णब यांना म्हटलं होतं. मात्र अर्णब यांनी कुणालच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. यानंतर इंडिगोनं कुणालवर सहा महिने प्रवास बंदी घालत असल्याचं जाहीर केलं.
I did this for my hero...
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
I did it for Rohit pic.twitter.com/aMSdiTanHo
काल झालेल्या या प्रकारानंतर आज पुन्हा एकदा अर्णब आणि कुणाल आमनेसामने आले. 'मी सकाळी लखनऊहून परतत असताना अर्णब माझ्याच विमानात होते. तुम्ही माझ्यासोबत चर्चा कराल का, असा प्रश्न मी त्यांना अतिशय नम्रपणे विचारला. मात्र त्यांनी फक्त हातानं इशारा करत मला तिथून जाण्यास सांगितलं. त्यानंतर मी तिथून बाजूला झालो,' अशी माहिती कुणालनं सकाळी ट्विट करुन दिली आहे.
FYI - Arnab Goswami was in my
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 29, 2020
flight again this morning while returning from lucknow... I again asked him politely if he wants to have a honest discussion he with his verbal arrogant hand jester he asked me to move away & I did that...
प्रवाशासोबत गैरवर्तन केल्यानं इंडिगोनं कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. यानंतर एअर इंडिया, स्पाईसजेट, गो एअर, एअर इंडियानंदेखील कुणालवर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं. तर एअर एशिया इंडिया, विस्तारा यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे. या घटनेबद्दल सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.