अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:48 AM2018-12-03T03:48:06+5:302018-12-03T03:48:08+5:30

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी या पदाची सूत्रे रविवारी स्वीकारली.

Arora accepted the post of Chief Election Commissioner | अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

Next

नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी या पदाची सूत्रे रविवारी स्वीकारली. निवडणुका निर्भय, निष्पक्ष, शांततामय वातावरणात व सारी मूल्ये पाळून व्हाव्यात यासाठी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, विविध संस्था, यंत्रणा व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुका आता नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली होतील. पुढील वर्षी महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, ओडिशा, हरियाणा, आंध्र प्रदेश, आदी राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Web Title: Arora accepted the post of Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.