धोका वाढला! Black Fungus चा 26 राज्यांत कहर; 20,000 रुग्णांवर उपचार सुरू, प्रशासनाच्या चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:29 PM2021-06-01T14:29:15+5:302021-06-01T14:36:02+5:30
20000 Patients Of Black Fungus : देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. देशातील 26 राज्यांत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. तब्बल 20 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. या इंजेक्शनचा इतका मोठा तुटवडा आहे, की एकूण मागणीच्या दहा टक्केही इंजेक्शनही सध्या उपलब्ध नाहीत. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एम्फोटेरिसिन-बीचे अतिरिक्त 30,100 डोस पाठवले आहेत. एम्फोटेरिसिन-बीचा उपयोग ब्लॅक फंगसच्या उपचारात केला जातो. हा आजार नाक, डोळे आणि कधीकधी मेंदूवर वाईट परिणाम करतो.
CoronaVirus Live Updates : बापरे! मे महिन्यात कोरोनाने घेतला सर्वाधिक लोकांचा बळी; भारताने इतर देशांना टाकलं मागे #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/6FrifWjIKz
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
गौडा यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना आज एम्फोटेरिसिन-बीचे 30,100 डोस पाठवले गेले आहेत. यात महाराष्ट्राला सर्वाधिक 5,900 आणि गुजरातला 5,630 उपलब्ध करुन दिले आहेत. यापाठोपाठ आंध्र प्रदेश 1,600, मध्य प्रदेश 1,920, तेलंगणा 1,200, उत्तर प्रदेश 1,710, राजस्थान 3,670, कर्नाटक 1,930 आणि हरियाणाला 1,200 दिले गेले आहेत. देशात अजूनही केवळ एक लाखाच्या आसपासचं एम्फोटेरिसिन-बीच्या उत्पादनाची क्षमता आहे. अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, लडाख,लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिजोराम, सिक्किम आणि नागालँड वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
Corona Vaccine : 8 जिल्ह्यातील 35 लसीकरण केंद्रांवर लसीच्या 500 व्हायल्स कचऱ्याच्या डब्यात आढळून आल्या; घटनेने खळबळ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaVaccination#CoronaVaccinationhttps://t.co/NuySjjxZ8z
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर हेगडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली, की ब्लॅक फंगसच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावं लागत आहे. मात्र तरीही त्यांचा जीव वाचवणं कठीण होत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. काही रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसताच रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर औषध आणि इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा (Black Fungus) मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
CoronaVirus News : खळबळजनक बाब म्हणजे 21 लाख देऊन खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा आतापर्यंत एकदाही केला नाही वापर #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Ambulancehttps://t.co/1knxAClEyb
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021