भुसावळात तब्बल ९२ हजार रेशनकार्ड रेशनमधील भीषण : तत्कालिन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पडून

By admin | Published: February 17, 2016 12:23 AM2016-02-17T00:23:39+5:302016-02-17T00:23:39+5:30

जळगाव : गोरगरीबांसाठी शासनाने दिलेल्या धान्यात दलाली करण्यासाठी बनावट रेशनकार्ड तयार करणार्‍या रॅकेटचा गौप्यस्फोट सोमवारी महसूलमंत्र्यांनी केला. जळगाव तालुक्यानंतर भुसावळात सर्वाधिक ९२ हजार १५५ रेशनकार्डचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळच्या तत्कालिन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला असताना त्यावर निर्णय न झाल्याने तो धुळखात पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.

Around 9 2 thousand ration card rush in Bhusaval: A proposal to suspend the Tahsildar | भुसावळात तब्बल ९२ हजार रेशनकार्ड रेशनमधील भीषण : तत्कालिन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पडून

भुसावळात तब्बल ९२ हजार रेशनकार्ड रेशनमधील भीषण : तत्कालिन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पडून

Next
गाव : गोरगरीबांसाठी शासनाने दिलेल्या धान्यात दलाली करण्यासाठी बनावट रेशनकार्ड तयार करणार्‍या रॅकेटचा गौप्यस्फोट सोमवारी महसूलमंत्र्यांनी केला. जळगाव तालुक्यानंतर भुसावळात सर्वाधिक ९२ हजार १५५ रेशनकार्डचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळच्या तत्कालिन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला असताना त्यावर निर्णय न झाल्याने तो धुळखात पडून असल्याची माहिती उजेडात आली आहे.

जिल्ह्यात साडे नऊ लाख रेशनकार्डधारक
जिल्हा पुरवठा विभागातर्फे बीपीएल, अंत्योदय, केशरी, अन्नपुर्णा, शुभ्र अशा विविध घटकांसाठी रेशनकार्ड दिले जाते. यात जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार ७७६ रेशनकार्डधारक आहेत. यात सर्वाधिक पाच लाख १९ हजार ८४२ रेशनकार्ड केशरी आहेत. जळगाव शहर आणि तालुक्यात सर्वाधिक एक लाख ५३ हजार ६४५ रेशनकार्ड आहेत. त्यापाठोपाठ भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात रेशनकार्डधारकांची संख्या आहे. मुक्ताईनगर तालु्क्यात ३४ हजार ६९१ रेशनकार्डधारक आहेत.
तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे
भुसावळच्या तत्कालिन तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मागविला होता. तो प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात त्यांची बदली होऊन त्यांना नाशिक आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही.
धान्य वितरणाची अशी आहे पद्धत
जिल्ह्यासाठी मनमाड येथून धान्याचा पुरवठा होत असतो. हे धान्य जळगाव येथील एफसीआय गोडावून व ममुराबाद येथील गोडावून येथे उतरविण्यात येते. या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व एफसीआयचे प्रतिनिधी सॅम्पल पद्धतीने धान्याची तपासणी करतात. त्यानंतर हे धान्य तालुकास्तरावरील गोडावूनवर पाठविण्यात येत असते. हे धान्य आदिवासी विकास महामंडळ व खरेदी विक्री महामंडळाच्या वाहनांच्यामार्फत रेशनदुकानदारांना पोहचविण्यात येते. या वितरण व्यवस्थे दरम्यान मोठ्या प्रमाणात धान्याचा काळा बाजाराची संधी असते.
कोट
भुसावळच्या तत्कालिन तहसीलदारांची यापूर्वी चौकशी झाली आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
अनिल पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: Around 9 2 thousand ration card rush in Bhusaval: A proposal to suspend the Tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.