साडे तीन लाख रेशनधारकांना मिळणार तुरदाळ एक कुटुंबाला एक किलो : १२० रुपये दराने मिळणार दाळ
By admin | Published: July 23, 2016 12:02 AM2016-07-23T00:02:35+5:302016-07-23T00:02:35+5:30
जळगाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे राज्यातील ७० लाख ७ हजार ५८९ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १२० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
Next
ज गाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे राज्यातील ७० लाख ७ हजार ५८९ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १२० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.तीन महिने मिळणार तुरदाळबाजारपेठेत तुरदाळीच्या किरकोळ दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनातर्फे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे तूरदाळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ऑगस्टपासून तीन महिने ही दाळ रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.साडे तीन लाख कुटुंबांना लाभअन्न नागरी पुरवठा विभागातर्फे अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना १२० रुपये किलो दराने ही दाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार ७२३ बीपीएल कार्डधारक व एक लाख ३६ हजार ९७७ अंत्योदय कार्डधारकांना लाभ होणार आहे.८४.७४ कोटींच्या भांडवली खर्चाला मान्यताराज्यभरात तूरदाळ वाटपासाठी ८४.७४ कोटी रुपयंाच्या भांडवली खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच दरमाह सात हजार मेट्रीक टन तूरदाळीच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च या विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.