अर्पिताकडे होत्या LIC च्या तब्बल ३१ पॉलिसी! सर्व पॉलिसीमध्ये एकच नॉमिनी, नाव होतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 09:02 PM2022-08-04T21:02:12+5:302022-08-04T21:03:32+5:30
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या चौकशीची व्याप्ती आता वाढत जात आहे. दररोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. ईडीच्या कोठडीत असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या बाबतीत आता आणखी एक खुलासा झाला आहे.
कोलकाता-
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या चौकशीची व्याप्ती आता वाढत जात आहे. दररोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. ईडीच्या कोठडीत असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या बाबतीत आता आणखी एक खुलासा झाला आहे. अर्पिताकडे LIC च्या एकूण ३१ पॉलिसी होत्या. महत्वाची बाब म्हणजे या सर्व पॉलिसीमध्ये नॉमिनी म्हणून पार्थ चॅटर्जी यांचं नाव होतं. आता अर्पिताच्या पॉलिसीमध्ये पार्थ चॅटर्जी नॉमिनी कसा? यावरुन सवाल उपस्थित झाला आहे. ईडीनं आता याच दृष्टीकोनातून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. दोघंही मोठ्या प्रमाणात एकमेकांशी आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेले होते असा संशय आहे.
ईडीच्या रिमांड कॉपीमधून महत्वाची माहिती समोर आली आहे. पार्थ आणि अर्पिता दोघही एपीए युटीलिटी कंपनीमध्ये भागीदार होते. अर्पितानं रोकड देऊन काही फ्लॅटही खरेदी केले आहेत. आता हा सर्व पैसा अर्पितानं कुठून आणला? याची ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांना पाच ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशी दरम्यान दोघांविरुद्ध ईडीला महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
अर्पितावर तर ईडीनं रंगेहात कारवाई केली आहे. अर्पिताच्या तीन ते चार फ्लॅटवर आतापर्यंत धाड पडली आहे. २७ जुलैला देखील ईडीनं अर्पिताच्या आणखी एका फ्लॅटवर धाड टाकली होती. या कारवाईत ईडीला २७ कोटी रुपये रोकड आणि ४.३१ कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त केलं आहे. ईडीनं चौकशी दरम्यान ४ सोन्याचे हार, १८ इयररिंग देखील जप्त केले आहेत. याआधीच्या छापेमारीत ईडीनं परदेशी चलनापासून बनावट कंपन्यांची कागदपत्र देखील ताब्यात घेतली होती. ईडीला कारवाईत भक्कम पुरावे हाती लागले आहेत. पण पार्थ चॅटर्जी तपासात सहकार्य करत नसल्याचं ईडीचं म्हणणं आहे. अर्पितानं सर्व रोकड पार्थ चॅटर्जीची असल्याचा कबुली जबाब दिला आहे. पण पार्थ यांनी अर्पिताचा दावा फेटाळून लावला आहे.