मला अटक करा, वृद्धाने पोलिसांना केला फोन, कारण समजताच ५ जणांविरोधात दाखल झाला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 08:35 PM2024-07-29T20:35:47+5:302024-07-29T20:36:23+5:30

Haryana Crime News: हरियाणामधील पानीपत येथे काल रात्री एका वृद्ध पतीने त्याच्या पत्नीची डोक्यावर काठी मारून हत्या केली. जेव्हा पतीने हल्ला केला तेव्हा पत्नी खातेवर झोपली होती. हत्येनंतर पतीने पोलिसांना फोन करून मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. मला अटक करा, असे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी पतीला ताब्यात घेतले.

Arrest me, the old man called the police, as soon as he found out, a case was registered against 5 people | मला अटक करा, वृद्धाने पोलिसांना केला फोन, कारण समजताच ५ जणांविरोधात दाखल झाला गुन्हा

मला अटक करा, वृद्धाने पोलिसांना केला फोन, कारण समजताच ५ जणांविरोधात दाखल झाला गुन्हा

हरियाणामधील पानीपत येथे काल रात्री एका वृद्ध पतीने त्याच्या पत्नीची डोक्यावर काठी मारून हत्या केली. जेव्हा पतीने हल्ला केला तेव्हा पत्नी खातेवर झोपली होती. हत्येनंतर पतीने पोलिसांना फोन करून मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. मला अटक करा, असे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी पतीला ताब्यात घेतले. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणसाठी रुग्णालयात पाठवला. 

दरम्यान, मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर ५ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी पतीने माझी पत्नी मानसिक आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर  तिच्यावर अनेक औषधोपचार केले. उपचार करून मी थकलो होतो. तसेच पत्नीही आजारपणामुळे त्रस्त होती. त्यामुळे मी तिची हत्या केली, असे सांगितले. 

याबाबत सिंघाना गावातील रहिवासी असलेल्या दिनेश कुमार याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, माझे भावोजी लक्ष्मण ऊर्फ लिच्छू हे पानीपतमधील दीनानाथ कॉलनीमध्ये राहतात. त्यांचे मुलगे आणि सुनांनी मिळून माझी बहीण गीता हिची मारहाण करून हत्या केली. हत्येपूर्वी गीता हिने दुसरी बहीण गुड्डी हिला सोमवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास फोन केला होता.  

Web Title: Arrest me, the old man called the police, as soon as he found out, a case was registered against 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.