सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 04:49 PM2021-12-28T16:49:34+5:302021-12-28T16:49:56+5:30

महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातून कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Arrest sanatani Kalicharan and get rid of him, Jitendra Awhad's anger about dharm sansad | सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप

सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप

Next

मुंबई - अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. मंत्री नवाब मलिक यांनी कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरणच्या अटकेची मागणी केली आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातून कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याच्या विधानसभेत मंत्री नवाब मलिक, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरण यांच्या विधानाबद्दल आक्षेप घेत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. आता, गृहनिर्माणमंत्री  


कालीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण, कधी मुस्लीम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि या ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करतो. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे. तसेच, हा सनातनी आहे, निवडणुकीला उभा राहिला तेव्हा 247 मत मिळाली, असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले. 

आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये कालीचरण बाबाचा त्याच व्यासपीठावर निषेध नोंदविणाऱ्या संतांना सलाम केला आहे.  ''हे खरे हिंदू संत जे भर धर्म संसदेत महात्मा गांधी ह्यांच्या विषयी जी भाषा वापरली त्याचा जाहीर निषेध तिथल्यातिथे केला आणि सभात्याग केला. सलाम...'' असेही आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कडक भूमिका

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही बघेल यांनी म्हटलं आहे. 

दोषींवर कारवाई करणार - बघेल

आता एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भूपेश बघेल यांनी केला आहे. चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Web Title: Arrest sanatani Kalicharan and get rid of him, Jitendra Awhad's anger about dharm sansad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.