सुब्रतो रॉयविरुद्धचे अटक वॉरंट रद्द
By admin | Published: April 22, 2017 01:50 AM2017-04-22T01:50:32+5:302017-04-22T01:50:32+5:30
सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय आणि तीन संचालकांविरुद्ध जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट विशेष सेबी न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. सुब्रतो रॉय आणि
मुंबई : सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय आणि तीन संचालकांविरुद्ध जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट विशेष सेबी न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. सुब्रतो रॉय आणि तीन संचालक विशेष न्यायालयापुढे उपस्थित राहिले होते.
सुब्रतो रॉय यांच्यासह रविशंकर दुबे, अशोक रॉय चौधरी आणि वंदना भार्गव या संचालकांनी प्रत्येकी दोन लाखांचा बेल बॉण्ड व खटल्याच्या प्रत्येक सुनावणीस हजर राहण्याची हमी दिल्यानंतर विशेष न्यायालयाने या सर्वांविरुद्ध काढलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.या चौघांवर १८ मे रोजी आरोप निश्चिती करण्यात येईल, असेही सेबी न्यायालयाने सांगितले.
सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन, सहारा हौसिंग इन्वेस्टमेंट आणि त्यांचे प्रमोटर सुब्रतो रॉय तसेच तीन संचालकांविरुद्ध सेबीने (सिक्युरिटी अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) २०१२मध्ये गुन्हा नोंदवला. त्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सिक्युरिटी लिस्ट न करताच गुंतणुकदारांकडून २४ हजार कोटी रुपये जमा जमा केला, असा सेबीचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)