आमदार सतीश पाटील व एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व फेटाळला
By Admin | Published: April 29, 2016 12:29 AM2016-04-29T00:29:36+5:302016-04-29T00:29:36+5:30
जळगाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
ज गाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला.जिल्हा बॅँकेची २ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅँकेचे तत्कालीन चेअरमन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासह आठ जणांविरुध्द १९ एप्रिल रोजी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार पाटील व प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांनी न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व अर्ज दाखल केला होता.२६ एप्र्रिल रोजी आरोपी व सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तीवाद झाला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत गुरुवारी निर्णय देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार न्या.के.पी.नांदेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. आरोपीतर्फे ॲड.वसंत ढाके,ॲड.हिंमत सूर्यवंशी, ॲड.प्रवीण पांडे यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी व फिर्यादीतर्फे ॲड.प्रमोद पाटील यांनी काम पाहिले.