स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींगची गरज - पंतप्रधान
By admin | Published: March 11, 2016 07:29 PM2016-03-11T19:29:58+5:302016-03-11T20:28:24+5:30
स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला आर्ट ऑफ लिव्हींगची गरज आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला आर्ट ऑफ लिव्हींगची गरज आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या व्यासपीठावरुन संबोधित करताना सांगितले. आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून जगाला भारताबद्दल माहिती मिळते.
भारतात विविधता असून, भारताने आतापर्यंत जगाला भरपूर काही दिले आहे. आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाच आपण अभिमान बाळगला पाहिजे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा कार्यक्रम कलेचा कुंभमेळा आहे आंतरराष्ट्रीय संबंधात सॉफ्ट शक्ती महत्वाची भूमिका बजावतात असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतातील विविधतेची प्रतिमा दाखवल्याबद्दल मी श्री.श्री.रविशंकर आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे अभिनंदन करतो असे मोदी म्हणाले. नेत्रसुखद अशा नृत्य कार्यक्रमाने श्री.श्री.रविशंकर यांच्या भव्य जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाला दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर शुक्रवारी संध्याकाळी सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील अनेक मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजन स्थळावरुन झालेल्या वादावर बोलताना 'हो ही माझी खासगी पार्टी आहे, संपूर्ण जग माझे कुटुंब आहे' असे रविशंकर यांनी सांगितले. जेव्हा तुम्हाला चुकीचे करायचे असते तेव्हा त्यात अडथळे येत नाहीत. पण जेव्हा तुम्हाला योग्य, मोठे कार्य करायचे असते तेव्हा त्यात अडथळे येतात असे रविशंकर म्हणाले.
नेहमी हसतमुख रहा आणि धैर्याने सर्व आव्हानांचा सामना करा असे श्रीश्री रविशंकर यांनी सांगितले. तीन दिवस चालणा-या या कार्यक्रमात ३५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता असून, १५५ देशांचे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
Cultural programmes underway at #WorldCultureFestival in Delhi, PM Modi at the venue. pic.twitter.com/SkwxDP79cz
— ANI (@ANI_news) March 11, 2016