जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 200 ते 250 लोक नजरकैदेत - राम माधव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 09:26 AM2019-10-01T09:26:33+5:302019-10-01T09:27:52+5:30

'दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये शांती आहे'

Article 370: Peace In J&K Since 200-250 People In Preventive Detention : Ram Madhav | जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 200 ते 250 लोक नजरकैदेत - राम माधव

जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 200 ते 250 लोक नजरकैदेत - राम माधव

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्र सरकराने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही स्थानिक लोकांना नजरकैद केले होते. याविषयी बोलताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 2000 ते 2500 लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, आता फक्त 200 ते 250 लोक नजरकैदेत आहेत. 

राम माधव म्हणाले, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की 200-250 लोकांना प्रतिबंधात्मक स्वरुपात ताब्यात घेतले आहे. काही जणांना 5 स्टार गेस्ट हाउसमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये शांती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर संबंधी फक्त एकच मुद्दा आहे. तो म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर (पीओके) यासंदर्भातील आहे. याआधीही भाजपा सरकारकडून या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे."  

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून एलओसीजवळ वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे.

शाळेत कलम '370 पे चर्चा', शाळकरी विद्यार्थी गिरवणार धडे
जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या घटनेची माहिती तरुण मुलांना समजावी यासाठी कलम 370 विषयची माहिती लवकरच शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्यातील जन जागरण सभेत सांगितले होते.

Web Title: Article 370: Peace In J&K Since 200-250 People In Preventive Detention : Ram Madhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.