Arun Jaitley Death: अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 03:54 PM2019-08-24T15:54:46+5:302019-08-24T16:00:17+5:30
देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले
नवी दिल्लीः देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावतच होती. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींनी जेटलींच्या कुटुंबीयांकडे फोन करून दुःख व्यक्त केलं. तसेच जेटलींच्या कुटुंबीयांनी मोदींना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका, असं सांगितल्याचीही माहितीही मिळाली आहे.
जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मोदींनाही अतीव दुःख झालं. बातमी समजल्यानंतर मोदींनी लागलीच जेटलींच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला. देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात. त्यामुळे तुम्ही तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश हा सर्वात पहिल्यांदा येतो. म्हणून तुमचा हा दौरा पूर्ण करूनच भारतात परता, अशा शब्दांमध्ये रोहन जेटलींनी मोदींकडे भावना व्यक्त केल्या. तसेच जेटलींसारखा चांगला मित्र गमावल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यात कोणताही बदल होणार नसल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे. 22 ऑगस्टपासून मोदी परदेश दौऱ्यावर गेले असून, मोदी आज बहरीनमध्ये पंतप्रधान ईसा बिन सलमान अल खलिफा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मोदी जी-7 परिषदेसाठी पुन्हा फ्रान्सला रवाना होणार आहेत. 25 आणि 26 ऑगस्टदरम्यान मोदी फ्रान्स दौऱ्यावर असून, त्यावेळीच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.Arun Jaitley Death : देशातील टॉप-10 वकिलांपैकी एक होते अरुण जेटलीhttps://t.co/Azi1SwpXVq#ArunJaitley
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2019
जेटलींच्या निधनाबद्दल मोदींनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मी माझा सगळ्यात जवळचा मित्र गमावला, अशा शब्दांत मोदींनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अशी पाच ट्विट केली आहेत. ''भाजपा आणि अरुण जेटली यांचं अतूट नातं होतं. एक विद्यार्थी संघटनेतील नेता म्हणूनही त्यांचं कार्य लक्षणीय ठरलंय. आणीबाणीच्या काळातही सरकारचा विरोध करण्यासाठी ते सर्वात पुढे होते. पक्षाची विचारधारा, ध्येय आणि धोरण समाजापुढे प्रभावीपणे मांडण्यात ते अग्रेसर असत. पक्षाच सर्वात आवडता चेहरा म्हणून जेटलींकडे पाहिलं जातं, अशी भावनिक प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली आहे.With the demise of Arun Jaitley Ji, I have lost a valued friend, whom I have had the honour of knowing for decades. His insight on issues and nuanced understanding of matters had very few parallels. He lived well, leaving us all with innumerable happy memories. We will miss him!
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019
Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवासhttps://t.co/3x0fuWTPIP#ArunJaitley
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2019