Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 03:58 PM2019-08-24T15:58:28+5:302019-08-24T17:39:54+5:30

जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 

Arun Jaitley Death: This is possible because of Arun Jaitley; Virender Sehwag expressed his gratitude | Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

Next

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. जेटलींच्या राजकारणाव्यतीरीक्त क्रिकेटवर देखील प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 

सेहवागने सांगितले की, अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या.  त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे सेहवागने स्पष्ट केले. 

तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले.

जेटलींना क्रिकेटमध्येही विलक्षण रस असल्याने क्रिकेट संघटनांमध्येही ते सक्रीय होते. सचिनला आव्हान देईल असा फलंदाज आमच्या दिल्लीत तयार होत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा असे जेटलींनी हसत सांगितले होते. वीरेंद्र सेहवाग या त्यावेळच्या उदयोन्मुख खेळाडूकडे त्यांचा कटाक्ष होता. सचिनची जागा तो घेईल असे त्यांना वाटत होते. ते भविष्य खरे ठरले नाही, पण वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटवर ठसा उमटविला हेही नाकारता येत नाही.

अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Web Title: Arun Jaitley Death: This is possible because of Arun Jaitley; Virender Sehwag expressed his gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.