शस्त्रक्रियेनंतर अरुण जेटली राज्यसभेत प्रथमच उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:03 AM2018-08-10T04:03:46+5:302018-08-10T04:03:59+5:30
केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे त्यांच्यावर गेल्या मे महिन्यात झालेल्या मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी राज्यसभेत पहिल्यांदाच उपस्थित राहिले.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे त्यांच्यावर गेल्या मे महिन्यात झालेल्या मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी राज्यसभेत पहिल्यांदाच उपस्थित राहिले. सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह सदस्यांनी जेटली यांचे सभागृहात स्वागत केले. जेटली हे राज्यसभेचे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेटली यांच्या सभागृहातील उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रियेनंतर जवळपास चार महिने जेटली सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. शस्त्रक्रियेपूर्वी जेटली यांच्याकडे अर्थ खाते आणि कंपनी कामकाज मंत्रालय होते. १४ मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्याकडील खाती हंगामी स्वरूपात पीयूष गोयल यांच्याकडे दिली गेली आहेत. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी मतदान पार पडल्यानंतर मोदी म्हणाले, जेटली परतल्यामुळे मी आनंदी आहे.