तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:33 PM2018-08-23T12:33:40+5:302018-08-23T12:34:40+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

Arun Jaitley returns as finance minister today | तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार

Next

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. 
अरुण जेटली यांच्याकडून आलेल्या अधिकृत पत्रामध्ये, 'मला अर्थ आणि कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयांची जबाबदारी देण्यात यावी असे राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सूचित केल्याचे' नमूद केले आहे. शस्त्रक्रीयेसाठी अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीतून सुटी घेतली होती. या काळामध्ये पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.




मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया झाल्यानंतर जेटली यांना तीन महिने कामकाजापासून दूर राहावे लागले. राज्यसभेत उपसभापतींच्या निवडणुकीमध्ये ते उपस्थित राहिले होते. त्यांना कोणत्याही इन्फेक्शनपासून दूर राहाण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. राज्यसभा उपसभापतींच्या निवडणुकीवेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यावर जेटली यांनी हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करणे पसंत केले होते. सुटीच्या काळातही अरुण जेटली समाजमाध्यमांमध्ये विविध ठिकाणी आपली मते मांडत होते.  अरुण जेटली यांनी आज ट्वीटरवरुन ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार कुलदीप नय्यर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



 

Web Title: Arun Jaitley returns as finance minister today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.