अरुण जेटलींचे आॅस्कर कोणाला?
By admin | Published: March 1, 2016 04:09 AM2016-03-01T04:09:34+5:302016-03-01T04:09:34+5:30
आॅस्कर पुरस्कारांची घोषणा आणि अरुण जेटलींचे बजेट यांची घोषणा एकाच दिवशी झाली. एकीकडे जगभरात आॅस्करची चर्चा असताना बजेटमध्ये जेटलींचे आॅस्कर कोणाला मिळाले असेल
आॅस्कर पुरस्कारांची घोषणा आणि अरुण जेटलींचे बजेट यांची घोषणा एकाच दिवशी झाली. एकीकडे जगभरात आॅस्करची चर्चा असताना बजेटमध्ये जेटलींचे आॅस्कर कोणाला मिळाले असेल?सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकद रेव्हनंट चित्रपटासाठी अलेजांद्रो इनानिर्तू हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. जेटलींच्या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार द्यावा लागेल.
सर्वोत्कृष्ट चित्रपट
इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझमवर आधारित स्पॉटलाईट हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला.जेटलींच्या बजेटचे आॅस्कर या वेळी ग्रामविकास आणि पायाभूत क्षेत्राला मिळून जाईल.
सर्वोत्कृष्ट अभिनेता
द रेव्हनंट चित्रपटासाठी लिओनार्डो डी कॅप्रियो याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला. जेटलींच्या बजेटमध्ये हाच मान ग्रामीण
भारतात राहणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना
मिळू शकेल.
सहायक
अभिनेता
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता या गटातील आॅस्कर ब्रिज आॅफ स्पाईज चित्रपटासाठी मार्क रायलन्सला मिळाला. जेटलींच्या बजेटचे आॅस्कर या वेळी स्कील इंडिया आणि ‘स्टार्ट अप’मध्ये जोमाने पुढे येणाऱ्या तरुणाईला द्यावे लागेल.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
जेटलींच्या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान गोरगरीब घरातील गृहिणीला जाऊ शकेल. जेटलींच्या बजेटची ती
हीरोईन
ठरली.
रूम या चित्रपटातील अभिनेत्री ब्री लार्सन ही आॅस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ठरली.
सर्वाधिक पुरस्कार
मॅड मॅक्स : फ्युरी रोड या चित्रपटाने सर्वाधिक सहा आॅस्कर मिळविले आहेत. जेटलींच्या बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद रस्ते विकासाला दिली गेली आहे.