४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 04:47 PM2024-06-02T16:47:56+5:302024-06-02T16:48:45+5:30

Arunachal Pradesh Assembly Election Result: ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने (BJP) दणदणीत विजय मिळवला आहे.

Arunachal Pradesh Assembly Election Result: Good news for BJP even before June 4, resounding victory in Arunachal Pradesh | ४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

४ जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील ६० जागांपैकी तब्बल ४६ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. यापैकी १० जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला होता.

१० जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने उर्वरित ५० जागांसाठी मतदान झालं होतं. त्या जागांवरील मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली. तसेच या मतमोजणीमध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा भाजपाच्या खात्यात विधानसभेतील ६० पैकी ४६ जागा जमा झाल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एनपीईपीने ५ जागांवर विजय मिळवला. ३ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर पीपीएला २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली. त्याशिवाय अपक्ष आमदार ३ जागांवर निवडून आले.

दुसरीकडे सिक्कीममध्येही विधानसभा निवडणुकीचा एकतर्फी निकाल लागला आहे. येथे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभेतील ३२ पैकी १ जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं. तर प्रतिस्पर्धी एसडीएफला केवळ एक जागा मिळाली. तर भाजपाला सिक्कीममध्ये खातंही उघडता आलं नाही. 

Web Title: Arunachal Pradesh Assembly Election Result: Good news for BJP even before June 4, resounding victory in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.