अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पक्षातून निलंबित

By admin | Published: December 30, 2016 06:57 AM2016-12-30T06:57:08+5:302016-12-30T06:57:08+5:30

अरुणाचल प्रदेशामध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह सहा जणांना पीपल्स पार्टी ऑफ

Arunachal Pradesh Chief Minister Pema Khandu suspended from the party | अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पक्षातून निलंबित

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पक्षातून निलंबित

Next
>ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. 30 - अरुणाचल प्रदेशामध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह सहा जणांना पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. 
मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह उपमुख्यमंत्री चौना मे, जॅम्बे ताशी, सी. टी. मे, पी.डी. सोना, झिंनू नामचूम आणि कामलुंग मोसांग या पार्टी विरोधी आमदारांना पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून निलंबित करण्यात आले आहे. 
अरुणाचल  प्रदेशच्या राजकरणात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत पेमा खांडू यांनी ४२ आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि सत्तास्थापन केली. यावेळी सत्तास्थापन करण्यासाठी पेमा खांडू यांना भाजपाची साथ घेतली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांच्याविरोधात धूसफूस वाढल्याचे दिसून येत होते. दरम्यान, पेमा खांडू यांच्यासह सहा जणांचे प्राथमिक सदस्यत्व पार्टीने रद्द केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा येथील राजकरण तापण्याची शक्यता आहे. 

Web Title: Arunachal Pradesh Chief Minister Pema Khandu suspended from the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.