India-China Conflict : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:14 PM2022-12-12T20:14:52+5:302022-12-12T20:19:35+5:30

India-China Conflict : या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

arunachal pradesh indian chinese soldiers clash at lac 20-30 soldiers injured, India-China Conflict | India-China Conflict : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

India-China Conflict : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

googlenewsNext

अरुणाचल प्रदेशमध्येभारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाल्याची माहिती आहे. तसेच, या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये एलएसीजवळ चीनच्या पीएलएच्या सैनिकांनी आधी झटापट सुरू केली. यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. या झटापटीत 20 ते 30 जवान जखमी झाले. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर दोन्ही बाजूंनी तातडीने परिसरातून माघार घेतली. या झटापटीनंतर कमांडर्समध्ये फ्लॅग मिटिंग झाली.

याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.

गलवान नंतरची पहिली मोठी घटना
दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते.

Web Title: arunachal pradesh indian chinese soldiers clash at lac 20-30 soldiers injured, India-China Conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.