अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग गेला वाहून
By Admin | Published: July 4, 2017 02:47 PM2017-07-04T14:47:38+5:302017-07-04T14:47:38+5:30
अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे
ऑनलाइन लोकमत
ईटानगर, दि. 4 - अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी ईटानगरसहीत सोमवारी (3 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत तर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे.
जोरदार झालेल्या या पावसात नहार्लगुन आणि ईटानगरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 415 चा मोठा भाग वाहून गेला आहे. सध्या युद्धपातळीवर या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. खबरदारी म्हणून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ईटानगर आणि नहार्लगुनला जोडणारा जुलांग रोडदेखील पावसात खचल्यानं मोठे नुकसान झालं आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदी किनार, भूस्खलनाच्या दृष्टीनं अति संवेदनशील परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीचा मुख्यमंत्र्यांनी अहवाल सोपवण्यात येणार असून मदतीसाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जातील, असे येथील अधिका-यांनी सांगितले आहे. दरम्यान, सगलीमध्ये अडकलेले चार रुग्ण, तीन मुलं, महिला आणि विद्यार्थ्यांसहीत 20 पेक्षा अधिक जणांना विमानाच्या सहाय्याने नहार्लगुन येथे सुखरुप पोहोचवण्यात आले.
Arunachal: Restoration work underway on NH 415. Landslide had washed away some road portion b/w Itanagar &Naharlagun, y"day after heavy rain pic.twitter.com/z7dVoNfb0l
— ANI (@ANI_news) July 4, 2017