"अरूंधती रॉय यांना केवळ जीपला बांधू नका तर गोळ्या घाला"
By admin | Published: May 22, 2017 10:30 PM2017-05-22T22:30:16+5:302017-05-22T22:30:16+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट करुन सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट करुन सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात केली आहे. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटचे नेहमी वादात राहणारा गायकअभिजित भट्टाचार्य याने समर्थन केलं आहे. केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्याने अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं आहे. हे ट्विट करून अभिजित भट्टाचार्य पुन्हा वादात सापडला आहे. त्याच्या या ट्विटनंतर ट्विटराइट्सकडून भट्टाचार्यला लक्ष्य करण्यात येत आहे. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे अभिजित भट्टाचार्य नेहमी चर्चेत असतो.
And shoot them.. https://t.co/iNZIeANL8Y
— abhijeet (@abhijeetsinger) May 22, 2017
कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान-
काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधून फिरवले होते. लष्कराच्या या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले होते. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला त्या मेजर नितिन गोगोई यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेजर नितिन गोगोई यांचा दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमन्डेशनने सन्मान करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी गोगोई यांचा सन्मान केला. गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देण्यात आले .