दगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉयला जीपला बांधा - परेश रावल
By admin | Published: May 22, 2017 01:19 PM2017-05-22T13:19:40+5:302017-05-22T13:20:13+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टिवट केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 22 - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट करुन सोशल मीडियावर नव्या लढाईची सुरुवात केली आहे. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले आहे.
परेश रावल यांनी महिन्याभरापूर्वीच्या या घटनेवर आता का भाष्य केलेय ? ते कळायला आधार नाहीय. पण परेश रावल यांच्या विधानाने काँग्रेसच्या हाती आयते कोलीत दिले आहे. परेश रावल हे अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अरुंधती रॉय या लेखिका असण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे.
काश्मीरमधील मानवी हक्कांबद्दल त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या भूमिकेवर अनेकांना आक्षेप आहे. 1997 साली
अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंगस या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले आणि हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले. काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडीओ आणि फोटो टि्वट करुन काश्मीरमधली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
Instead of tying stone pelter on the army jeep tie Arundhati Roy !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 21, 2017