मानहानी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:13 PM2018-03-15T21:13:03+5:302018-03-15T21:13:03+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या एका प्रकरणामध्ये माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या एका प्रकरणामध्ये माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे. यासंदर्भातील लिखित माफीनामा न्यायालयाला सादर करण्यात आला आहे.
गतवर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी विक्रम मजिठिया यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवली होती. त्यावेळी केजरीवाल यांनी मजिठिया यांना ड्र्ग्ज माफिया म्हटले होते. त्यावेळी मजिठिया यांनी केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांच्यावतीने माफीनाम्याचे पत्र जमा करण्यात आले आहे. आज मजिठिया यांनी केजरीवालांकडून जमा करण्यात आलेले हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर दाखवले.
It is an historical moment for me personally and may be otherwise also where a sitting chief minister has apologised for the remarks he had made : Bikram Singh Majithia in Chandigarh pic.twitter.com/iddtwMg6II
— ANI (@ANI) March 15, 2018
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आप आता आपल्या नेत्यांवर दाखल असलेले सर्व प्रकारचे मानहानीचे खटले मिटवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मजिठिया यांची केजरीवाल यांनी माफी मागितली आहे. केजरीवाल यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अन्य नेत्यांनी मानहानीचे खटले दाखल केले आहेत. या खटल्यांमुळे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत असल्याचे आपच्या नेत्यांचे मत आहे.